रुग्णालयात उपचारासाठी कोरोना चाचणीची आवश्यकता नाही, केंद्र सरकारने जाहीर केले नवीन नियम

0

- Advertisement -

नवी दिल्ली: यापुढे रुग्णालयात उपचारांसाठी कोरोना संसर्गाची तपासणी करणे अनिवार्य असणार नाही. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्याअंतर्गत रूग्णालयात रूग्णांना दाखल करण्याच्या राष्ट्रीय धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना बदलल्या

- Advertisement -

आतापर्यंत रुग्णालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह अहवाल अनिवार्य होता. नव्या बदलांनुसार या अहवालाची अनिवार्यता आता रद्द केली गेली आहे. तपासणी अहवाल मिळवण्यासाठी रुग्णांची खूप हेळसांड सहन करावी लागत होती. परिणामी, अनेक रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत नवीन धोरण लागू केले जावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार संशयित रूग्णांना सस्पेक्टेड वॉर्डात दाखल केले जाईल. हे वॉर्ड कोविड केअर सेंटर, पूर्णपणे समर्पित कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमध्ये देखील बांधले जातील. रूग्णांना त्यांच्या राज्याच्या आधारे उपचार करण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, असेही नवीन धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.