पेट्रोल-डिझेलच्या किंमती नजिकच्या काळात नाही होणार कमी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले ‘हे’ कारण

0

- Advertisement -

दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होत असलेली वाढ येत्या काही काळात कमी करू शकणार नाही असे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.

देशात इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त असून अनेक राज्यात पेट्रोल प्रति लिटर शंभर रुपयांपेक्षा अधिक किंमतीने विक्री होत आहे.

त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरांवर लावण्यात येणा-या उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही असे म्हटले असून काँग्रेसप्रणित युपीए सरकारच या वाढीव इंधन दरांसाठी जबाबरदार असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी करण्याची चालबाजी केली होती, मी मात्र तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच सरकारी तिजोरीवर अतिरीक्त भार पडला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात इंधनाचे दरात घट होणे कठीण आहे, असे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

यूपीए सरकारने जारी केलेल्या ऑइल बॉण्ड्सच्या व्याजापोटी सरकारने गेल्या पाच वर्षात ६२ हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. तसेच २०२६ पर्यंत अजून ३७ हजार कोटी रुपये व्याज भरावा लागणार असल्याचे अर्थमंत्री सितारमण म्हणाल्या असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी इंधन दरवाढीला कॉंग्रेस प्रणीत सरकार जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोड़ून काढला आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात पेट्रोलियम कंपन्यांना झालेला नफा आणि त्यांच्याद्वारे सरकारी तिजोरीत भरणा करण्यात आलेल्या रकमा, त्याचा लेखाजोखा कंपन्यांच्या अधिकृत कागदपत्राद्वारे पत्रकारांसमोर मांडला.

 ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.