घाबरू नका, दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेतले तरी काहीही धोका नाही – निती आयोग

0

- Advertisement -

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात काही नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस दिले गेल्याने मोठी खळबळ उढाली होती. तसेच अनेक लोकांनी असे दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या डोस घेण्याने दुष्परिणाम होण्याची शंका उपस्थित केली होती.

परंतु, जर एखाद्या व्यक्तिला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस, हा पहिल्या डोस पेक्षा वेगळ्या कंपनीचा मिळाला तर त्याचा काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही असे स्पष्टीकरण आज (27 मे) आरोग्य मंत्रालयाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय लस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि निती आय़ोगाचे सदस्य डॅा. व्हि. के पॅाल यांनी दिले आहे.

तसेच वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांनुसार (Protocol) पहिला डोस ज्या लसीचा मिळाला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घ्यायला पाहीजे. जर असे झाले नसेल तर त्याचा चौकशी झाली पाहीजे. परंतु असे दोन वेगवेगळ्या लसीचे डोस दिले गेले तर काही त्याचे काही विपरित परिणाम होत नाहीत. अशा पद्धतीने लसीकरण झालेल्या लोकांना कोणताच धोका नाही. तसेच केंद्रीय पातळीवर अशा पद्धतीने Mix & Match लसीकरण करण्याच्या चाचण्या घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे पॅाल यांनी एएनआय़ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हंटले आहे. तरी, परंतु दोन्हीही डोस एकाच लसीचे घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

(काय आहे वाचा ‘MIx and Match’ लसीकरणाची पद्धत )

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील औदहीकला जवळपास 20 लोकांना पहिला डोस कोविशील्ड ह्या लसीचा देण्यात आला होता त्यानंतर गेल्या 14 मे रोजी त्यांना दुसरा डोस कोव्हॅक्सीन लसीचा दिला गेला. या बातमी मुळे त्या भागातील लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिका-याने अशी चुक झाल्याचे मान्य करीत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.