महत्वाची बातमी: मुलांनाही देता येईल ‘ही’ कोरोना लस, भारतातही वापरास संमती

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशातील लसीकरण मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारने अमेरिकेच्या फायझर आणि माडर्ना या कंपन्यांच्या लसींना मोठी सवलत देण्याचे जाहीर  केले आहे. या लसींच्या साईड इफेक्टसाठी कंपनीला काहीच दंड आकारण्यात येऊ नये या अटीला आता केंद्राने संमती दर्शविली आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या लसी भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मुख्य बाब म्हणजे फायझर ही जगातील एकमेव औषध उत्पादक कंपनी आहे, जिची कोरोना प्रतिबंधक लस लहान मुलांना दिली जात आहे. त्यामुळे भारतातही ह्या कंपनीच्या लसी लहान मुलांना दिल्या जाऊ शकतात असे दिल्लीतील भारतीय आर्युविज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॅा. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने बुधवारी (2 जून) फायझर आणि माडर्ना या दोन्ही कंपन्यांच्या लसीला आपात्कालीन मंजूरी देण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने अमेरिका, इंग्लंड आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या द्वारे सुचित केलेल्या लसींना भारतात या आधीही अशीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे अशा सुचित केलेल्या लसीला कोणत्याही चाचणी विना भारतात वापरण्यास मंजूरी देणे हे काही नवे नाही. किंवा हे काही पहिल्यांदाच घडते आहे असे नाही. त्यामुळे मला वाटते की भारतात लवकरच लहान मुलांसाठी फायझर कंपनीची लस लवकरच उपलब्ध होईल असे डॅा. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.

सुरवातीला फायझर कंपनीने आपल्या चाचण्यांची माहिती प्रसिद्ध न केल्याने त्यांच्या मंजूरीला उशीर होत होता. तसेच फायझर लसीचे लसीकरणानंतरचे दुष्परिणामा संर्दभात काही बातम्या येत होत्या. परंतु आता अमेरिका आणि इंग्लंड मधील त्यांच्या लसीच्या वापराची तसेच त्याच्या दुष्परिणामांची माहीती उपलब्ध झाली असल्याने आता भारतातही फायझरच्या लसीच्या वापरास संमती देण्यात आली असल्याचे डॅा. गुलेरिया यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.