पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना, भरगच्च कार्यक्रमांचा अमेरिकेचा दौरा

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारताने मानवतेकडे नेहमीच एक कुटुंब म्हणून पाहिले आहे. भारतीय औषध उद्योगाने किफायतशीर निदान किट, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि पीपीई किट तयार केल्या आहेत ज्या जगात उपयोगी सिद्ध झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी आयोजित केलेल्या कोविड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जाताना म्हटले आहे.

कोविड साथीच्या आजाराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या मोठ्या परदेशी दौऱ्यासाठी आज (22 सप्टेंबर)अमेरिकेला रवाना झाले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन बिडेन यांची भेट घेतील, असे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत. यात क्वालकॉम, अॅडोब, ब्लॅकस्टोन, जनरल अॅटोमिक्स आणि फर्स्ट सोलर आदी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधानांना भेटतील.

“पंतप्रधान मोदी 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौ-यावर असून कोविड -19 महामारी दरम्यान त्यांची ही पहिली मोठी परदेशी भेट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन बिडेन यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये होणारी भेट हा या दौ-यादरम्यानचा एक ठळक मुद्दा असेल. राष्ट्रपती बिडेन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली वैयक्तिक भेट आहे. दोन्ही नेते गेल्या काही महिन्यांपासून नियमित संपर्कात आहेत.” असे श्रृंगला यांनी सांगितले.

- Advertisement -

सुरक्षा, संरक्षण आणि व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय बैठक होईल, असेही शृंगला म्हणाले, तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानच्या परिस्थितीवरही चर्चा केली जाईल.

दरम्यान पंतप्रधान कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात मोदींनी म्हटेल आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार  मी 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्या दरम्यान, अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर मी  भारत-अमेरिका  यांच्यातील  व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेणार आहे तसेच परस्पर  हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही आपली मते मांडू आणि विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष  कमला हॅरिस यांचीही भेट घेण्यासाठी मी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह पहिल्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेत  मी व्यक्तिशः सहभागी होणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असल्याचे त्यांच्या कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.