e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-व्हाउचर-आधारित डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी ( e-RUPI) सेवेचा शुभारंभ केला आहे. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे, जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट केले जाईल.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, eRUPI व्हाउचर देशातील डिजिटल व्यवहारांमध्ये डीबीटी अधिक प्रभावी बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे आणि ते डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम देईल. प्रत्येकाला लक्ष्यित, पारदर्शक आणि गळती मुक्त सेवा देण्यात ते मदत करेल. ते म्हणाले की,  लोकांचे जीवन तंत्रज्ञानाशी जोडून भारत कसा प्रगती करत आहे याचे ई-रुपी हे प्रतीक आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सव साजरा होत असताना  भविष्याच्या दृष्टीने हा क्रांतिकारी उपक्रम सुरु होत आहे  याचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की सरकार व्यतिरिक्त, जर कोणत्याही संस्थेला उपचार, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कामासाठी कोणाला मदत करायची असेल तर ते रोख रकमेऐवजी  eRUPI व्हाउचर देऊ शकतील. यामुळे हे  सुनिश्चित होईल  की त्याने दिलेले पैसे त्याच कामासाठी वापरले जातील ज्यासाठी रक्कम दिली गेली होती.

सरकारच्या मते, याद्वारे योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यास मदत होईल. ही सेवा वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहेत फायदे –

ही कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पद्धत आर्थिक व्यवहारातील दोन्ही व्यक्ति वा संस्थांना जोडते. सरकारी योजनांचा आर्थिक लाभ थेट लाभार्थ्यांपर्यत जाईल. ही एक QR कोड किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे. जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर थेट पाठवले जाईल. या वन टाईम पेमेंट सर्विसमध्ये युजर्स कोणत्याही कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय व्हाउचर REEDEM करू शकतील. e-RUPI द्वारे, सरकारी योजनांशी संबंधित विभाग किंवा संस्था कोणत्याही फिजिकल कॉन्टॅक्टशिवाय लाभार्थी आणि सर्विस प्रोवाइडरशी थेट जोडल्या जातील.  ई-रुपी हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील.

ही सेवा प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन ई-रुपी देते. या डिजिटल व्हाउचरचा उपयोग खाजगी क्षेत्र देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून घेऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.