सरकारच्या ‘या’ योजनेचा मोफत लाभ घ्या; मिळतोय 5 लाख रूपयांचा फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती

0

- Advertisement -

नवी दिल्ली: सामान्य जनतेच्या हितासाठी सरकारच्या अनेक योजना असतात. परंतु माहिती अभावी बर्‍याच लोकांना त्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सध्या केंद्र सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे आयुष्मान भारत योजना. देशातील गरीब कुटुंबांना मोफत आणि उत्तम उपचार सुविधा देण्यासाठी मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -PMJAY) सुरू केली आहे. ही योजना देशातील त्या गरीब लोकांसाठी आहे ज्यांना महागड्या दवाखान्यात उपचार घेणे शक्य नाही.

या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला मोठ्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा दिली जाते. या योजनेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विमा घेणाऱ्या व्यक्तीला उपचाराचा खर्च भरावा लागणार नाही.

जाणून घ्या काय आहे योजना?

आयुष्मान योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात 5 लाख रुपये उपचारासाठी दिले जातात. या मोहिमेअंतर्गत तुमच्या घरी येऊन संबंधित अधिकारी तपशील घेतील आणि त्यानंतर कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. हे कार्ड पीव्हीसीच्या स्वरूपात उपलब्ध असेल. विशेष गोष्ट म्हणजे यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत, ही सुविधा पुर्णपणे मोफत आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत येणाऱ्या लोकांकडे कायमस्वरूपी कार्ड असेल, जेणेकरून त्यांना आजारपणाच्या वेळी रुग्णालयात उपचार करता येतील आणि उपचार घेणार्‍यांना विम्याचे पैसे मिळू शकतील. हा या मोहिमेचा उद्देश आहे.

- Advertisement -

आयुष्मान भारत योजनेत तुमचे नाव कसे जोडावे?

आयुषमान भारत योजनेत संपूर्ण कुटुंबाचे नाव समाविष्ट करण्यासाठी, आपल्याला आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन संबंधित अधिकार्‍याशी संपर्क साधावा लागेल. या योजनेसाठी पात्र असलेल्या कोणत्याही नागरिकाला आयुष्मान कार्ड दिले जाते. जर एखाद्या पात्र व्यक्तीने कार्ड बनवले नसेल, तर ते अॅडमिट होण्याच्यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या पंतप्रधान आरोग्य मित्राला भेटून त्याचे कार्ड बनवून घेऊ शकतात.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.