महाप्रतापी.. बनावट रेमडेसिविरचा काळा बाजार, ग्लूकोज आणि मीठाच्या पाण्याच्या वापर

0

- Advertisement -

अहमदाबाद: कोरोनाच्या संकट काळात पैसे कमाविण्यासाठी गुजरात मधील काही जणांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन बनविण्यासाठी नामी शक्कल लढवित ग्लुकोज आणि मीठाच्या पाण्याचे मिश्रण करून नामांकित औषध कंपनींच्या बाटल्यांतून विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे.

गुजरात राज्यातील मोर्बी येथील स्थानिक गुन्हे शाखेने ह्या बनावट रेमडेसिविर काऱखान्याचे रॅकेट उधडकीस आणले आहे.

नामांकित कंपन्यांच्या ब्रँडचे लेबल केलेले, हे सर्व बनावट रेमडेसिविर इंजेक्शन्स च्या बाटल्या गुजरात राज्यातील विविध भागात विक्रीसाठी पाठविल्या जात असल्याचे समोर पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

मोरबी, सूरत आणि अहमदाबाद येथे छापे टाकून या बनावट इंजेक्शनच्या सुमारे 3 हजार 371 बाटल्या आणि अशी बनावट इंजेक्शन विकून मिळविलेले सुमारे 90 लाख रुपयांची रोख रक्कम आरोपींकडून जप्त केली आहे.

याप्रकरणात आतापर्यंत याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल केला गेला असून त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

गरजू रुग्णाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ही बनावट इंजेक्शने 2500 ते 5000 रुपयांपर्यंत विकली जात होती.

यावर गुजरातचे गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी कोविड – 19 ने ससंर्ग ग्रस्त असलेल्या रूग्णांचा जीव धोक्यात घालण्याच्या या गुन्ह्यातील गंभीरता आणि त्यांचे प्रयत्न पाहता आरोपींवर  भारतीय दंड संहितेचे कडक कलम लावून जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून दंडात्मक कारवाई केली जाईल.

सुरत जिल्ह्यात ह्या इंजेक्शनचे पॅकेजिंग होत असलेल्या कारखान्यासही पोलिसांनी सील ठोकले आहे.

काळा बाजार करणा-या विरोधात दंडात्मक कारवाई

इंजेक्शनच्या तीव्र कमतरतेनंतर राज्यातील विविध ठिकाणी याचा काळा बाजार तसेच बेकायदेशीर साठवणूक कऱण्याच्या काही घटना घडल्या आहेत. सरकार अशा घटकांवर बारीक नजर ठेवून आहे आणि भारतीय दंड संहीतेच्या विविध कलमांतर्गत त्यांच्यावर सहा महिने ते सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद ठेवून कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती जडेजा यांनी दिली आहे. चालू महामारीत राज्यात लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाबद्दल 2 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद देखील आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.