आनंदाची बातमी: घरगुती गॅस रिफिलींग पोर्टेबिलिटी, दुस-या वितरकांकडूनही होईल गॅस ऱिफिलींग

0

- Advertisement -

नवी दिल्ली: एलपीजी (घरगुती गॅस) ग्राहकांना त्यांनी नोंदणी केलेल्या गॅस वितरकांव्यतिरीक्त इतर कोणत्याही वितरकांकडून एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेता येणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अशी सुविधा काही ठराविक शहरांत प्रायोगित तत्वार सुरु केली असूून आता ग्राहकांना आपल्या गॅस वितरण वितरकाची निवड आता करता येणार आहे.

एलपीजी ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि सर्वांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या, तेल विपणन कंपनी (ओएमसी) मधील पत्त्यासह असलेल्या वितरकांच्या यादीमधून ग्राहकांना त्यांचा “वितरण वितरक” निवडता येईल. प्रायोगिक तत्वावर चंडीगढ , कोइम्बटूर , गुडगाव, पुणे आणि रांची या शहरांमधून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

नोंदणीकृत लॉग इन वापरुन मोबाईल अ‍ॅप / ग्राहक पोर्टलवर एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेण्यासाठी नोंदणी करताना वितरणाच्या वितरकांची  यादी त्यांच्या कामगिरी क्रमवारीसह दर्शविली जाईल. त्यात ग्राहक त्यांना हवा त्या गॅस वितरण वितरकाला निवडू शकतात.

 

डिजिटल एलपीजी सेवा

तंत्रज्ञानाचा लाभ घेत ,ग्राहकांना डिजिटल प्लॅटफार्मद्वारे ,एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी नोंदणी आणि पैसे भरण्यास मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी  खालील डिजिटल उपक्रम स्वीकारले आहेत. या डिजिटल व्यवस्थे व्यतिरिक्त, ग्राहक उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप फॉर न्यू गव्हर्नन्स) अ‍ॅप किंवा भारत बिल पे सिस्टम अ‍ॅप्स आणि मंचाद्वारे त्यांचे एलपीजी सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात. याव्यतिरिक्त ग्राहक त्यांच्या ई-कॉमर्स अॅप्सद्वारे सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात आणि पैसे भरू शकतात. उदा. ऍमेझॉन , पेटीएम इ.

Mode Indane Bharat Gas HPGas
Portal and Mobile App: Customers can book refill, update personal records, apply for portability, transfer of connection, address change and all other refill related services. https://cx.indianoil.in and IndianOil One mobile app https://my.ebharatgas.com

and Hello BPCL mobile app

https://myhpgas.in

and

HP Pay mobile app

 

Refill Booking through IVRS and SMS number:

 

77189 55555 7715012345

7718012345

 

List of state wise

telephone numbers-

www.hindustanpetroleum.com

/hpanytime

Refill Booking through Missed Call 84549 55555 7710955555 9493602222
WhatsApp 75888 88824 1800224344 9222201122

 

- Advertisement -

एलपीजी ग्राहकांसाठी एलपीजी जोडणी पोर्टेबिलिटी

ग्राहक रहात असलेल्या भागात सेवा देणार्‍या दुसर्‍या वितरकाकडे एलपीजी जोडणीचे ऑनलाईन हस्तांतरण करण्याची सुविधा आता ग्राहकांना संबंधित तेल विपणन कंपन्यांच्या  वेब-पोर्टल तसेच त्यांच्या मोबाइल अॅप्सद्वारे प्रदान करण्यात आली आहे.

नोंदणीकृत लॉग इन वापरून ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील  वितरकांच्या यादीमधून त्यांच्या तेल विपणन कंपनीचा  वितरक निवडता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या  एलपीजी जोडणीचा वितरक बदलून घेण्यासाठी पर्याय मिळेल.

ही सुविधा विनामूल्य आहे आणि या सुविधेसाठी कोणतेही शुल्क किंवा हस्तांतरण  शुल्क देय नाही. तेल विपणन कंपन्यांनी सुरु असलेल्या मे महिन्यापर्यंत 55 हजार 759 पोर्टेबिलिटी विनंत्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.