CoWIN एवढी सक्षम प्रणाली जगात कुठेही नाही – पंतप्रधानांचे जोरदार समर्थन, आयुष्यमान भारत डिजीटल मिशनची केली सुरवात

0

- Advertisement -

नवी दिल्ली: काही दिवसांपुर्वी इंग्लंडने भारताच्या लसीकरणातील प्रमाणपत्रासंबंधी उपस्थित केलेल्या शंकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CoWIN या लसीकरणाच्या डिजीटल प्लॅटफॉर्मचे समर्थन करीत प्रत्युत्तर दिले आहे.

“लसीकरण नोंदणीपासून प्रमाणपत्रापर्यंत CoWIN एवढी मोठी आणि कार्यक्षण प्रणाली जगात इतर कोणतीही नाही” असे पंतप्रधान म्हणाले. विविध प्रमुख वैद्यकीय कल्याण योजनांपैकी एक – आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला, त्या प्रसंगी बोलत ते होते.

गेल्या आठवड्यात लसीकरण प्रमाणपत्रा बाबतीत इंग्लंडने समस्या नमूद केली होती, आणि दुहेरी लसीकरण केलेल्या भारतीयांनाही इंग्लंडमध्ये प्रवेश केल्यावर विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे असे जाहिर केले होते. त्यावर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जोरदार आक्षेप नोंदविला होता.

आज केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजीटल मिशनच्या शुभारंभ करण्यात आला, ज्याचा मुख्य घटक प्रत्येक नागरिकासाठी एक आरोग्य ओळखपत्र तयार करण्याचा आहे ज्यामध्ये नागरिकांचे सर्व वैयक्तिक वैद्यकीय आणि आरोग्य रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.

हे आरोग्य ओळखपत्र नागरिकांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल. या योजनेत वैयक्तिक आरोग्य नोंदी मोबाईलच्या मदतीने जोडल्या जाऊ शकतात; आरोग्य व्यावसायिकांची नोंदणी आणि आरोग्य सुविधांची नोंदणी,  तसेच आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे भांडार म्हणून कामही करेल.

- Advertisement -

या अभियानाचे उद्दिष्ट डिजिटल आरोग्य परिसंस्थेमध्ये आंतर -कार्यक्षमता निर्माण करण्याचा असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट कऱण्यात आले आहे.

“हे मिशन डिजिटल आरोग्य इकोसिस्टममध्ये आंतर-कार्यक्षमता निर्माण करेल, पेमेंटमध्ये क्रांती आणण्यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेसने घेतलेल्या भूमिकेप्रमाणे. नागरिक केवळ आरोग्य सुविधा मिळवण्यापासून एक क्लिक दूर असतील, ”असे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी गेल्या वर्षी 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केली होती. सध्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक टप्प्यात राबवले जात आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा देशव्यापी आरंभ राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) बरोबर होतो, जो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) ची तिसरी वर्धापन दिन साजरा करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडावियाही यावेळी उपस्थित होते.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.