कोरोना रुग्णांचे होणार मोफत उपचार ‘या’ राज्याने केली घोषणा

0

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीने अनेक नागरिकांना आर्थिक संकटात टाकलेले असतानाच त्यांना उपचाराचा खर्चाचा मोठा भार सहन करावा लागतो आहे.

परंतु पंजाब राज्य सरकारने मात्र राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या नागरिकांनी पंजाब राज्य सरकारच्या सरबत सेहत विमा योजनेत नाव नोंदणी करून सहभाग घेतला असेल त्या सर्व नागरिकांवर कोरोना आजारासाठी मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा आज मंगळवारी केली आहे.

- Advertisement -

पंजाब राज्यातील सर्व नागरिक जे सरबत सेहत विमा योजनेत सहभागी झाले आहेत, त्यांचे या योजनेत समाविष्ट (em-panelled) असलेल्या 241 सार्वजनिक आणि 626 खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील, असे पंजाब राज्याचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिंधू यांनी एएनआय या वृत्तसंस्तेशी बोलताना स्पष्ट केले आहे.

 

पंजाब राज्यात सोमवारी 4 हजार 539 नवे कोरोनाबाधित सापडले असून तेथे एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 34 हजार 475 एवढी आहे. तसेच राज्यात काल 178 लोकांचा कोरोना मुळे मृत्यु झाला असून राज्यात कालपर्यंत 13 हजार 468 लोकांचा बळी गेला आहे. राज्यात पाझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर हा 6.51 टक्के आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.