अरेव्वा ! सरकारने केले पाण्याचे बिल माफ, आता मासिक शुल्क फक्त 50 रुपये

0

- Advertisement -

चंदीगड: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मासिक पाणी वापराचे शुल्क 50 रुपये निश्चित केले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात 700 कोटी रुपयांची मागील थकित पाण्याची बिले माफ करण्याचीही घोषणा केली आहे.

“पंजाबच्या लोकांना मोफत पाणी आणि सांडपाण्यासाठीची सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या सेवांसाठी शुल्क आकारण्याच्या केंद्राच्या निर्देशानुसार 50 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे,” चन्नी म्हणाले.

- Advertisement -

“शहरी आणि ग्रामीण भागात सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या कूपनलिकांचे वीज बिल सरकार माफ करणार असून भविष्यात अशा कूपनलिकांचे वीज बिल पंजाब सरकार भरेल,” असेही ते म्हणाले.

तसेच पंजाब प्रशासनात वर्ग 4 कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याऐवजी आता त्यांची नियमित भरती केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलांचे (बीएसएफ) कार्यक्षेत्र वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करणार असल्याचेही ते म्हणाले तसेच या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्र लिहिले असून  बीएसएफच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार हा पंजाबच्या हक्कांचा प्रश्न आहे. गरज पडल्यास आम्ही सर्वपक्षीय बैठकही बोलवू असेही ते म्हणाले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.