देशात कोरोनाचा कहर सुरूच, एकाच दिवसात आढळले विक्रमी 4 लाख नवीन रुग्ण

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने देशातील परिस्थित आणखी चिघळत चालली आहे. नवीन रुग्णांची संख्या आणि दररोज होणार्‍या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, याक्षणी कोरोनाचा कहर थांबलेला दिसत नाही. शनिवारी पहिल्यांदाच देशात 4 लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून 3523 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जगभरात केवळ अमेरिका या एकाच दिवसात चार लाखाहून अधिक कोरोना संसर्गाची नोंद झाली होती. तसेच कोरोनातून बरे झालेल्यांची संख्याही लक्षणीय असून ती गेल्या 24  तासांत 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

 

शनिवारी जगभरात आढळून आलेल्या नवीन बधितांच्या आणि कोविड मुळे झालेल्या मृत्युंच्या संख्येत भारत सर्वात पुढे आहे. देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने, सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची कमतरता कायम आहे. स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे. अनेक ठिकाणी स्मशानभूमीत जागा नसल्यामुळे मृतदेहांचे अंत्यसंस्कारासाठी आता उद्याने खुली केले जात आहेत.

प्रथमच देशात चार लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले

- Advertisement -

शनिवारी आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 4,01,993 रुग्ण आढळले आहेत. यासह, इतर कोरोना बाधित देशांपेक्षा भारतात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. 22 एप्रिलपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे.

आता ही संख्या चार लाखांच्याही पलीकडे गेली आहे. यासह, देशातील संक्रमित लोकांची एकूण संख्या 1,91,64,969 वर पोहोचली. याआधी शुक्रवारी देशात सर्वाधिक 3.86 लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते

मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता वाढली

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशात कोरोनामुळे होणार्‍या मृत्युंच्या संख्येतही सतत वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3523 लोक मरण पावले. यासह कोविडमुळे झालेल्या मृत्यूची संख्या 2 लाख 11 हजार 853 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.