दिलासादायक. रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल

0

- Advertisement -

हैदराबाद: देशात संथगतीने सुरु असलेल्या करोना लसीकरण मोहीमेस गती प्राप्त होण्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून मागविण्यात आलेल्या स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप आज भारतात हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. एकूण लसीचे 1 लाख 50 हजार डोस पहिल्या खेपेत भारतात दाखल झाले असल्याची माहीती डॅा.रेड्डीज् लॅब या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. दिपक सप्रा वृत्तमाध्यमांना दिली आहे.

भारतात डॅा. रेड्डीज् लॅव या औषध निर्माण कंपनीला ही लस भारतात आयात व वितरीत करण्याची संमती भारतीय औषध नियंत्रक महानिरीक्षण संस्थेकडून देण्यात आली आहे.

देशात आज (1 मे)पासून १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र  लसींच्या तुटवड्या अभावी अनेक राज्यांत ही मोहीम अडखळत सुरु आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप दाखल झाल्याने लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

सध्या भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड या लसींचा वापर लसीकरण मोहीमेत केला जात आहे. आता स्पुटनिक व्ही ही तिसरी लस उपलब्ध झाली आहे.

 

- Advertisement -

“या लसीला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. या लसीचं देशात लवकरच प्रोडक्शन सुरु होईल आणि वर्षाकाठी ८५० दशलक्ष डोस तयार करण्याचा मानस आहे.’, असे रशियाच्या राजदूतांनी सांगितले आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची फोनवर चर्चा झाली होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.