मोठा निर्णय: 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याविरोधात दाखल सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने केल्या रद्द

0

- Advertisement -

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका फेटाळून लावल्या आणि विद्यार्थ्यांच्या निकालाचे  मूल्यांकन करण्यासाठी बोर्डाने आणलेल्या मूल्यांकन योजनेला पुढे नेण्यास परवानगी दिली. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि आयसीएसई 12 वीच्या निकालासाठीच्या मूल्यमापन योजना योग्य आणि तार्किक ठरवल्या आहेत.

शाळा निकालात घोटाळा करू नये, यासाठी असेल एक निकाल समिती

मूल्यांकन योजनेत शाळांकडून होऊ शकणार्‍या घोटाळ्याच्या आरोपाबाबत कोणतेही आदेश मंजूर करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यासाठी एक निकाल समिती असेल, जी त्याकडे लक्ष देईल, असा सुप्रीम कोर्टाने निष्कर्ष काढले काढला आहे. समितीत केवळ शाळाच नाही तर बाह्य सदस्यही असतील.

त्याचबरोबर न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्याना मूल्यांकन योजनेची निवड किंवा परीक्षेला हजर राहण्याचा पर्याय निवडू द्यावे, ही मागणीही फेटाळली. त्याबरोबरच जुलैमध्येच बारावीची परीक्षा घेण्याची मागणीही फेटाळण्यात आली.

निकालबाबत असमाधानी विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेत भाग घेण्याची मिळेल संधी

- Advertisement -

सोमवारी सीबीएसई बोर्डाने 12वीच्या पर्यायी परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेण्यास सांगितले होते. सीबीएसई बोर्डाने सांगितले की, आम्ही पूर्वी जाहीर केलेल्या मूल्यांकन धोरणातून निकाल तयार करत असून 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर होईल. मूल्यांकन आणि निकालाबाबत असमाधानी विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानच्या परीक्षेत भाग घेण्याची संधी दिली जाईल.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.