देशात विषाणूच्या दुस-या लाटेला ओहोटी

0

- Advertisement -

नवी दिल्ली : गेल्या एप्रिल – मे महिन्याच्या सुरुवातीला शिगेला पोहोचलेली करोना विषाणूच्या संक्रमणाची दुसरी लाटेला आता ओहोटी लागली असल्याचे चित्र समोर येते आहे. मंगळवारी (1 जून) सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी (31 मे ) 1 लाख 27 हजार 510 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत करोनामुळे 2795 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या एका दिवसात 2 लाख 55 हजार 287 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

थोडक्यात देशातील करोनाबाधित रुग्णांची माहीती –

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : 2 कोटी 81 लाख 75 हजार 44

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : 2 कोटी 59 लाख 47 हजार 629

- Advertisement -

उपचार सुरू : 18 लाख 95 हजार 520

एकूण मृत्यू : 3 लाख 31 हजार 895

करोना लसीचे डोस दिले गेले : 21 कोटी 60 लाख 46 हजार 538

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 लसीचे डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले असून त्यातील 27 लाख 80 हजार 58 लसीचे डोस सोमवारी देण्यात आले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.