सिरम इन्स्टिट्युटची मागणी, कायद्यासमोर सर्व समान मग आम्हालाही कायदेशीर संरक्षण द्या

0

- Advertisement -

नवी दिल्लीः फायजर आणि मॉडर्नानंतर कोविशिल्ड लस बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या सवलती आणि कायदेशीर संरक्षण आम्हालाही द्या अशी मागणी कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लस बनविणा-या सीरम इन्स्टिट्यूटनेही केली आहे.

अॅस्ट्रजेनका आणि ऑक्सफोर्डच्या करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. या लसीला भारतात कोविशिल्ड असे नाव देण्यात आले आहे.

सरकार विदेशी कंपन्यांना कायद्याने सुरक्षा देत असेल तर कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. अशीच सुरक्षा आम्हालाही मिळाली पाहिजे, इतकेच नाही तर देशात लसीचे उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कंपनीला कायदेशीर सुरक्षा द्यावी असे सीरम इन्स्टिट्युटने म्हटले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

- Advertisement -

जगातील अनेक देशांनी लस उत्पादक कंपन्यांना सुविधा दिल्या आहेत. फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी अमेरिका ब्रिटनसह अनेक देशांकडून कायदेशीर सुरक्षा मागितली आहे. बहुतेक देशांनी ती दिली आहे. लस दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कायदेशीर पेच निर्माण होत असेल तर त्यासाठी आपण उत्तरदायी राहणार नाही, अशी अट या कंपन्यांनी भारत सरकार समोर ठेवली होती.

त्यानंतर विदेशी कंपन्या लसी आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करत असतील तर त्यांना मंजूरी नंतरच्या चाचण्यांपासून (Post approval trials) सवलत देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालायने बुधवारी स्पष्ट केले होते.

दरम्यान रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीचे उत्पादन करण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने दर्शवली असून त्यासाठी सीरमने भारतीय औषध महासंचालकांकडे (DCGI) लसीच्या चाचणीसाठी परवाना देण्याची मागणी केली आहे.. रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून उत्पादन करण्यात येत आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.