कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर रशियन लस स्पुतनिक-V 90 टक्के प्रभावी

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने लाखो लोकांना कोरोनाबाधित केले आहे. इतर अनेक देशातही या स्वरूपाचा संसर्ग पसरत असल्याने  जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या व्हेरिएंटवर रशियन लस स्पुतनिक-व्ही 90 टक्के प्रभावी असल्याची माहिती रशियाच्या गामालेया इंस्टीट्यूटचे उपसंचालक डेनिस लोगुनोव यांनी ही माहिती दिली आहे. याच संस्थेने स्पुतनिक-व्ही लस तयार केली आहे.

डेनिस म्हणाले की, डेल्टा व्हेरियंट विरूद्ध स्पुतनिकच्या क्षमतेचे मूल्यांकन डिजिटल नोंदींच्या आधारे केले आहे. यावेळी रशियामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव खूप वाढला आहे. रशियन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात 90% पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे डेल्टाची आहेत.

जगभरात पसरला आहे डेल्टा व्हेरियंट

भारतात 2 महीने गोंधळ माजवल्यानंतर डेल्टा व्हेरियंट जगभरात वेगाने पसरत आहे. कोरोनाचे हे स्वरूप अतिशय संसर्गजन्य आहे. भारतात दुसर्‍या लाटेसाठी याच प्रकाराला जबाबदार ठरवले जात आहे. आता ब्रिटनमध्ये अचानक वाढलेल्या कोविड रुग्णांनासाठी डेल्टा स्वरूपच जिम्मेदार आहे.

भारतात डेल्टा व्हेरियंटच्या उत्पारिवर्तनाचा धोका

- Advertisement -

भारतात डेल्टा व्हेरियंटमुळे आलेली दुसरी लाट ओसरत असतानाच, डेल्टाचे उत्परिवर्तन डेल्टा प्लसची 12 राज्यात प्रकरणे सापडली आहेत. हा डेल्टा प्लस व्हेरियंट डेल्टा पेक्षाही जास्त धोकादायक असल्याचे तज्ञांचे मत आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.