कोविड मृत्यु सानुग्रह अनुदान: राज्य सरकारांना भरपाई द्यावीच लागेल, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

0

- Advertisement -

नवी दिल्ली:  सर्वोच्च न्यायालयाने कोविड महामारीत मृत पावलेल्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांचे (एक्स-ग्रेशिया) सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. जरी मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये मृत्यूचे कारण कोविड नसल्याचा उल्लेख असला तरीही आवश्यक वैद्यकिय कागदपत्रे सादर केल्यास मृत्यु प्रमाणपत्रे बदलण्याचा अधिकार संबंधित अधिका-यांना असेल. तसेच कोणतेही राज्य सरकार अशी रक्कम लाभार्थ्यांना नाकारण नाही असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले.

तसेच अर्ज सादर केल्याच्या 30 दिवसांच्या आत राज्यांना  रक्कम वितरीत करण्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (4 आक्टोबर) कोविड मृत्यूंसाठी सानुग्रह भरपाई देण्याचे आदेश पारित केले. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह भरपाई देण्याबद्दलचे युक्तीवाद मान्य केला आहे.

“मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची रक्कम दिली जाईल आणि ती विविध कल्याणकारी योजनां अंतर्गत केंद्र आणि राज्याने दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल,” असे न्यायालयाने म्हटले आहे.

” कोविड -19 मुळे मृत्यु भरपाईच्या मिळण्यासाठी, पीडितांना कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा रुग्णालयांच्या सुविधेत कोविड आरटी-पीसीआर चाचणीचे निदान झाले असणे गरजेचे आहे. ही चाचणी मृत्यूच्या 30 दिवसांच्या कालावधीच्या आत असेल,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.

“जर कुटुंबातील सदस्य कोविड म्हणून मृत्यूच्या कारणाचा अधिकार पूर्ण करत असेल तर कोणतेही राज्य मृत्यू प्रमाणपत्रात कोविड चा उल्लेख नसल्याच्या कारणास्तव 50,000 रुपये सानुग्रह रक्कम नाकारणार नाही,” असे स्पष्टपणे न्यायालयाने अधोरेखित केले.

- Advertisement -

कोविडच्या आजाराला बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सानुग्रह भरपाई देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना निर्देश देण्याच्या याचिकेवर हा आदेश पारित करण्यात आला आहे.

राज्य आपत्ती निवारण निधीतून पेमेंट करावे लागेल आणि ते अर्ज सादर केल्याच्या 30 दिवसांच्या आत करावे लागेल आणि कोविड -19 प्रमाणे मृत्यूचे कारण प्रमाणित केले जाईल.

“लाभार्थीची संपूर्ण माहिती प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित केली जावी,” असेही न्यायालयाने म्हटले आहे.

30 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एनडीएमए) कोविड -19 मध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना एक्स ग्रेशिया भरपाई भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश दिले होते.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.