CBSE च्या 12 वी परिक्षेचे भवितव्य अधांतरीच, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तहकूब

0

- Advertisement -

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) च्या द्वारे घेण्यात कऱण्यात येणा-या 12 वीच्या परिक्षां रद्द करण्याबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा रद्द करण्यात यावी याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारतर्फे येत्या काही दिवसांत या परिक्षांबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच याबाबत आणखी स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे येत्या गुरुवार पर्यंत वेळ मागण्यात आली आहे. ती कोर्टाने मंजूर करीत आजची सुनावणी तहकूब करून येत्या 3 जून रोजी सुनावणी होईल असे सांगितले.

दरम्यान तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, परंतु जर मागील वर्षी या परिक्षांबाबत जो निर्णय घेण्यात आला होता, तो निर्णय केंद्र सरकार यंदाच्या वर्षी बदलत असले तर त्याची ठोस कारणे केंद्र सरकारला द्यावी लागतील असे आज झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला स्पष्ट केले आहे.

मागील वर्षी या परीक्षांच्या बाबतीत जे धोरण अवलंबिण्यात आले होते ते यंदाही लागू करण्यात येऊ शकते असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्यानंतर त्याची चौकशी करून निर्णय देण्यात येईल असे सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी 10 वीच्या परिक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत, परंतु 12 वीच्या परिक्षा मात्र स्थगित केल्या गेल्या. त्यामुळे 12 वीच्या परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार  विविध राज्य सरकारे आणि केंद्रीय परिक्षा मंडळांशी परिक्षा केव्हा आणि कशा घ्यायच्या यावर वारंवार चर्चा करीत असून उद्या (1 जून) 12 वीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल असे  केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे.

मागील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग याच्या अध्यक्षयतेखाली झालेल्या एका बैठकीत  CBSE  ने, 12 वीच्या परिक्षा 15 जूलै ते 26 ऑगस्ट दरम्यान घेण्यात याव्यात आणि सप्टेंबर अखेर पर्यंत निकाल देण्यात यावा असा प्रस्ताव सरकारला दिला आहे. तसेच परिक्षांच्या तारखा जाहीर करण्याअगोदर विद्यार्थ्यांना 15 दिवसांचा कालावधी देण्यात यावा असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

तसेच फक्त मुख्य विषयांच्या वस्तुनिष्ठ पद्धतीने परिक्षांचे आयोजन केले जावे आणि त्यासाठीचा वेळही कमी करण्यात यावा असे ही प्रस्तावात म्हटले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार या प्रस्तावाला 32 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी 29 राज्यांनी परीक्षांच्या कालावधी कमी करण्यासाठी संमती दर्शविली आहे.

काय आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे

CBSE च्या 12 वीच्या परिक्षा रद्द करण्यात याव्यात आणि अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.