भारताचे असेल खास Digital चलन, वर्षअखेरपर्यंत तांत्रिक मॉडेल होणार कार्यरत

0

- Advertisement -

मुंबई : जगभरात बदलत असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थाही मागे नाही. गेल्या दोन दशकांपासून भारतात आर्थिक व्यवहारात चलनांचे मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर झालेली आपण पाहिली. त्यात प्रथम कागदी चलन Paper Currency त्याच्यानंतर आलेले प्लॅस्टिक मनी म्हणजे अर्थातच Debit आणि Credit कार्ड्स, आणि सध्या आर्थिक व्यवहारात आपण सर्व जण अऩुभव घेत असलेले डिडीटल मनी ट्रान्झेंक्शन्स.

आता आर्थिक व्यवहारातील चलनांच्या स्थित्यंतराचा पुढचा टप्पा जगात अस्तित्वात आला आहे, तो म्हणजे Cryptocurrency चा अर्थात डिजिटल आभासी चलनाचा. त्याला जगातील अनेक देशांनी मान्यता दिलेली नसली तरी अनेक मोठ्या जागतिक औद्योगिक आणि गुंतवणूकदार कंपन्यांनी मात्र त्यात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. बिटकॅाईन हे वैध चलन, या देशाने दिली जगात प्रथमच मान्यता

भारतही या बदलाच्या उंबरठ्यावर असून भारताचेही स्वतःचे आभासी चलन पुढल्या काही वर्षात आपल्याला पहायला मिळाले तर नवल वाटू नये. कारण भारतीय रिझर्व्ह बॅंकेने या आभासी चलनासाठी लागणा-या एका तांत्रिक सॉफ्टवेअर मॉडेलला विकसित केले असून ते या वर्षी म्हणजेच 2021 च्या शेवटापर्यंत कार्यरत होण्याची शक्यता आहे, असे खुद्द ऱिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी सांगितलंय.

त्यांच्या म्हणण्यानुसार भारत आता डिजिटल चलन टप्प्याटप्प्याने सादर करण्याचा विचार करत आहे, त्याच्यासाठी आता वेळ आली आहे. चीनने आपल्या डिजिटल चलनासाठी आधीच ट्रायल रन सुरू केले आहे, तर बँक ऑफ इंग्लंड आणि यूएस फेडरल रिझर्व्ह देखील याकडे गांभिर्याने लक्ष देत आहेत. आरबीआय डिजिटल चलन सादर करण्याच्या निमित्ताने त्याची व्याप्ती, तंत्रज्ञान, वितरण यंत्रणा आणि प्रमाणीकरण यंत्रणा यासारख्या अनेक पैलूंचे अंतर्गत मूल्यांकन करत आहे.

आरबीआय मध्ये यावर अनेक वर्षांपासून काम चालू आहे, ज्यात बिटकॉईन सारख्या खाजगी क्रिप्टोकरन्सीद्वारे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता दिसून आली आहे जी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. परंतु बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीची अस्थिरता ही आरबीआयसाठी एक चिंताजनक बाब आहे आणि भारतातही असे डिजिटल चलन सुरु करणे हे त्यांचा वापर मर्यादित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल असू शकते. रिझर्व्ह बँकेला अशा खाजगी डिजिटल चलनांचे योग्य पद्धतीने नियमनही केले जात नसल्याचे सरकारला कळवले असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) अंतर्गत e-RUPI नावाचे नवीन डिजिटल पेमेंट इन्स्ट्रुमेंट सुरू झाले आहे. भारतात डिजिटल चलन आणण्याच्या दिशेने ई-रुपी हे पहिले पाऊल असल्याचे म्हटले जाते. तथापि, दोन्ही अनेक प्रकारे एकमेकांपासून भिन्न आहेत.

- Advertisement -

डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सीपेक्षा कसे वेगळे आहे?

डिजिटल चलन, सोप्या शब्दात, सरकारने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केलेले फियाट मनी आहे. हे नेहमी नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता असते, म्हणून अधिक विश्वासार्ह आहे.

दुसरीकडे, क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे तयार केली गेली आहे आणि मजबूत एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहे. हे अनियमित आणि खाजगी मालकीचे आहे.

क्रिप्टोकरन्सी अत्यंत अस्थिर असतात ज्यामुळे कंपन्या त्यांना पेमेंट म्हणून स्वीकारण्यास नाखूष असतात पर्यायाने डिजिटल चलन हे अधिक विश्वासार्ह आणि पेमेंटचे औपचारिक स्वरूप म्हणून व्यापकपणे स्वीकारले जातात.

क्रिप्टोकरन्सी सध्या डार्क नेटवरच जास्त लोकप्रिय आहेत. अशा चलनांसाठी खुप मोठे तांत्रिक सुरक्षा कवच लागते जे अनेक देशांकडे पुरेशा प्रमाणात नसल्याने त्याचा स्विकार करण्यासाठी ते अजूनही तयार नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.