महाउद्रेक कायम …….काळजी घ्या……!

सलग तिस-या दिवशी उद्रेक कायम

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोना साथ रोगाचा प्रभाव वाढतच चालला असून शनिवारी (24 एप्रिल) सलग तिस-या दिवशी देशात पुन्हा एकदा तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात या साथीमुळे 3 लाख 46 हजार 786 इतक्या नागरिकांना संसर्ग झाला असून त्यामुळे देशात संसर्ग झालेल्या एकूण नागरिकांची संख्या आता 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 इतकी झाली आहे.

शनिवार (24 एप्रिल) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 25 लाखाहून अधिक कोरोना संसर्गाची संख्या आहे.

तसेच 2624 लोकांच्या मृत्यूंची नोंद होऊन मृतांची संख्या 1 लाख 89 हजार 544 इतकी झाली आहे.

आकडेवारीच्या दृष्टीने शनिवारी संसर्ग झालेल्यांची संख्याच सर्वाधिक नाही तर एका दिवसात मृतांची संख्याही सर्वाधिक आहे.

- Advertisement -

संसर्गाने सक्रिय रुग्णांची संख्या वाढणे हे जास्त काळजी करण्यासारखे असून देशातील 25 लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण एकतर हॅास्पीटलमध्ये दाखल आहेत वा घरात विलगीकरणात आहेत.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 29,01,412 लोकांना देशात लसीचे डोस देण्यात आले. त्यामुळे कोविड विरोधी लस घेणा-यांची संख्या वाढून 13 कोटी 83 लाख 79 हजार 832 इतकी झाली आहे.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.