देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ गुन्ह्यासाठी महिला खासदार दोषी, कोर्टाने दिली 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा

0

- Advertisement -

हैदराबाद: निवडणुकांच्या वेळी अनेक वेळा खासदारांवर पैसे देऊन मते विकत घेतल्याचा आरोप केला जातो. देशात प्रथमच कोर्टाने एखाद्या खासदाराला या आरोपांसाठी शिक्षा सुनावली आहे. तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या (टीआरएस) महिला खासदार मालोथ कविता यांना नामपल्ली येथील विशेष सत्र न्यायालयाने मतदारांना लाच दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

कविता तेलंगणाच्या महबुबाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. या प्रकरणात त्यांच्या एका साथीदारालाही कोर्टाने दोषी ठरवले असून त्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली.

मालोथ कविता यांना 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी मतदारांना लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यासाठी त्यांना 6 महिन्यांचा कारावास आणि 10 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्याकरिता जामीन मंजूर झाला असून, खासदार कविता कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध तेलंगणा उच्च न्यायालयात लवकरच अपील करणार असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ही घटना 2019 मध्ये उघडकीस आली जेव्हा महसूल अधिकार्‍यांनी खासदार कविताचे सहयोगी शौकत अली यांना पैसे वाटत असताना पकडले होते. खासदार कविता यांना मत देण्यासाठी ते बरगमपहाड येथील नागरिकांना 500 रुपये देत होते. पोलिसांना शौकत अलीला रंगे हात पकडण्यात यश आले. त्यांना लाचखोरी प्रकरणात प्रथम आरोपी बनवण्यात आले व खासदार कविता यांना दूसरा आरोपी बनवण्यात आले.

- Advertisement -

कोर्टात पुरावे सादर…

सुनावणीच्या वेळी पोलिसांनी उड्डाण पथकातील अधिकारी आणि त्यांचा अहवाल पुरावा म्हणून सादर केला. विचारपूस केल्यावर अलीनेही गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने हा पैसा खासदार कविता यांच्या सांगण्यावरूनच त्याने पैसे वाटप केल्याचे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.