धक्कादायक: नर्सिंग कर्मचार्‍याने ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ चोरून रुग्णांना दिले पाण्याचे इंजेक्शन, जाणून घ्या कुठे घडली ही घटना

0

- Advertisement -

कोरोना संकटकाळात औषधांचा काळाबाजार करणा-यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. राजस्थान मधील कोटा या ठिकाणी असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णांसाठी जीवनरक्षक मानल्या जाणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पकडण्यात आलेल्या दोन सख्या भावांच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा झाला आहे.

यात एका भावाने दोन रुग्णांच्या रेमेडिसिव्हिर इंजेक्शन्स चोरल्या. नंतर रुग्णांना पाण्याचे इंजेक्शन दिले. चोरी केलेले इंजेक्शन अधिक किंमतीत विकण्यासाठी स्वतःकडे ठेवले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही धक्काच बसला.पोलिसांनी दोन्ही भावांकडून दोन इंजेक्शन्स जप्त केले आहेत.

अटक केलेले दोन्ही आरोपी बुंदी जिल्ह्यातील निमोडा येथील रहिवासी असून ते सख्खे भाऊ आहेत. दोघेही सध्या महावीर नगरमध्ये राहतात. त्यांना 15 मे रोजी पकडण्यात आले. यापैकी मनोज सध्या पोलिस रिमांडवर आहे, तर आरोपी राकेशला तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

एक रुग्णालयात काम करतो आणि दुसरा प्रयोगशाळेत

या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू कुमार यांनी सांगितले की, मुख्य आरोपी मनोज रेगर हा कोटा हार्ट हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत असे. चौकशी दरम्यान रूग्णालयात दाखल असलेल्या दोन रूग्णांच्या रेमेडिसिव्हिर इंजेक्शन्स चोरले असल्याची कबूली मनोजने दिली आहे. नंतर, रुग्णांना पाण्याचे इंजेक्शन देण्यात आले. मनोजचा भाऊ राकेश रुग्णालयाजवळील लॅबमध्ये काम करतो. कोविड वॉर्डमध्ये नमुने घेण्यासाठी तो रुग्णालयात जात असे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.