आधार कार्ड नसेल तरीही घेता येईल लस

0

- Advertisement -

एखाद्या व्यक्तिकडे आधार कार्ड नसल्यास त्याला कोरोना लस घेण्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, असे UIDAIने म्हणजेच आधार कार्ड तयार करणा-या युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेत आधार कार्ड पुरावा म्हणून दाखवणे गरजेचे आहे. मात्र आता आधार कार्ड नसेल तरीही लस घेता येईल तसेच औषधे खरेदी करणे आणि रुग्णालयात दाखल होतानाही उपचार सुरु करण्याआधी आधार कार्ड दाखवण्याची  गरज नसल्याचे UIDAIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णालयात उपचारांसाठी भरती होताना आधार कार्ड अभावी औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी मिळाणारे नकार बंद होतील.

आधार अभावी जर एखादी सुविधा वा सेवेला नकार देण्यात आला तर त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करावी असे UIADIकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

UIDAIने असे देखिल म्हटले आहे की, जर काही कारणास्तव नागरिकांकडे आधार कार्ड नसेल तर आधारच्या कायद्यानुसार त्यांना आवश्यक सेवांसाठी नाकारता येणार नाही. आधार कार्ड नसल्याने किंवा आधार कार्डचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन झाले नसले तरी संबंधित विभागाला किंवा एजंसीला त्या नागरिकास सेवा द्यावा लागतील. आधार कार्ड नसल्यास एखादी आवश्यक सेवा देण्यास नकार देण्यात आला तर इतर कोणत्याही ओळख पटविण्यासंबंधित पुरावा सादर करावा.

UIDAIने घेतलेला हा निर्णय देशातील सर्व नागरिकांसाठी फार महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसी घेणाऱ्या त्याचप्रमाणे उपचारांसाठी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.