आनंददायक बातमी: सरकारी रुग्णालयात ४०० रुपये, तर खासगी रुग्णालयात ६०० रुपये प्रति डोस

सिरमने ठरविले ‘कोविशिल्ड’ लसीचे ठरले दर

0

- Advertisement -

नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बुधवारी केंद्रला, राज्याला आणि खासगी रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यात येणा-या कोविडशिल्ड लसीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार कोविशिल्डची लस 400 रुपये प्रति डोस दराने खरेदी करावी लागेत तर खासगी रुग्णालयांना यासाठी 600 रुपये द्यावे लागतील. या व्यतिरिक्त, केंद्र सरकारला खरेदीसाठी  150  रुपये प्रतिडोस प्रमाणे लसींचे डोस हे मिळणे सुरूच आहे. आज कंपनीने या किंमती जाहीर केल्या आहेत.

भारत सरकार लस कोविशिल्ड आणि को-व्हॅक्सीन ह्या दोन्ही लसी 157.50 रुपये/डोस या दराने खरेदी करते, तर राज्ये आणि खासगी रुग्णालयांना वेगळी किंमत मोजावी लागणार आहे. याशिवाय येत्या 5 महिन्यांत किरकोळ बाजारात (औषधांच्या दुकानांतुनही)  ही लस उपलब्ध होईल.

केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसी देण्याचे जाहीर केले असून लसीकरण मोहिमेत असलेले निर्बंध आता शिथिल केले आहेत. तसेच राज्ये, खासगी रुग्णालये आणि औद्योगिक संस्थांना लस उत्पादकांकडून थेट खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर आता त्याचे दरही जाहीर झाले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटने एका निवेदनात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर भारतात लसीचे दर कमी आहेत. अमेरिकन लस प्रति डोस 1500 रुपये मिळत असेल तर रशियन लसच्या एका डोसची किंमत 750 रुपये आहे. त्याचप्रमाणे चिनी लसची किंमतही प्रति डोस 750 रुपये आहे. या संदर्भात भारतातील लसीची किंमत इतर देशांच्या लसीपेक्षा कमी आहे.

- Advertisement -

लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) एसआयआय आणि भारत बायोटेकला भविष्यात लसींचा पुरवठा करण्यासाठी 4,500 कोटी रुपये आगाऊ देण्यास मान्यता दिली आहे. एसआयआय आधीच ठरलेल्या प्रतीडोसच्या 150 रुपये दराने 20 कोटी डोस सरकारला देईल तर भारत बायोटेक 9 कोटी डोस पुरवेल.

या 4500 कोटींपैकी सीरम संस्थेला 3,000 कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1,500 कोटी रुपये मिळणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला सिरम इन्स्टिट्युटचे आदर पूनावाला लसीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कंपनीला सुमारे 3000 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची केंद्राकडे मागणी केली होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.