लहान मुलांसाठीच्या करोना लसीसाठी लागतील 1900 रुपये ?

0

- Advertisement -

नवी दिल्ली: वयाची 12 वर्षे पुर्ण केलेल्या मुलांना कोविड विषाणू प्रतिबंधक लस भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे. झायडस कॅडिला या औषध निर्माण कंपनीची ZyCov-D या तीन डोसच्या लसीच्या किंमतीवर केंद्र सरकार आणि झायडस कॅडिला यांच्यात चर्चा सुरू आहे.

कंपनीने या लसीसाठी 1900 रु किंमत प्रस्तावित केली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.  तरी सरकार किंमत कमी करण्यासाठी वाटाघाटी करत आहे आणि यासंदर्भात अंतिम निर्णय या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे.

झायडस कॅडिला यांनी भारतात विकसित केलेली, जगातील पहिली डीएनए-आधारित इंजेक्शन-मुक्त कोविड -19 लस लवकरच देशव्यापी कोरोनाव्हायरस विरोधी लसीकरण मोहिमेत सादर केली जाईल असे गेल्या गुरुवारी केंद्र सरकार द्वारे हे स्पष्ट करण्यात आले होते.

- Advertisement -

“कंपनीने त्याच्या तीन-डोस च्या या लसीसाठी करांसहीत 1,900 रुपये किंमत प्रस्तावित केली आहे. वाटाघाटी सुरू आहेत. कंपनीला लसीच्या किंमतीबाबत सर्व बाबींचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. लसीच्या किंमतीबाबत अंतिम निर्णय या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे, ”असे या प्रस्तावातील चर्चेशी जवळीक असलेल्या अधिका-याने पीटीआयला सांगितले आहे.

ZyCoV-D लसीची किंमत Covaxin आणि Covishield पेक्षा वेगळी असावी, कारण ही लस तीन डोसची असण्याव्यतिरिक्त ती 30 हजार रुपये किंमत असलेल्या इंजेक्शन-मुक्त ‘जेट इंजेक्टर’ वापरून दिली जाणार आहे, असे या लसीच्या वाटाघाटींसंबंधी माहिती असलेल्या आणखी एका अधिका-याने सांगितले आहे.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.