स्टेरॉईडचा अतिवापर टाळावा; Mucormycosis चा होतो चेहरा, नाक, डोळे, मेंदूवर परिणाम

0

- Advertisement -

म्यूकोर्मिकोसिस (Mucormycosis) हा सेकंडरी संसर्ग, बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापेक्षाही उच्च मृत्यूदाराचे कारण बनत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी त्याला रोखण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा (protocols) अवलंब करणे गरजे आहे असे भारतीय आर्युविज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॅा. रणदिप गुलेरिया यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

कोविड 19 च्या प्रादुर्भावापूर्वी म्युकरमायकोसिस संसर्गाची फारच कमी उदाहरणे होती. पण आता कोविड आजारत स्टेराईट्स चा वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणात हा आजार पसरत आहे. या आजाराची देशभरात 500 हून अधिक प्रकरणे समोर आली असून, हा रोग चेहरा, नाक, डोळ्याची कक्षा किंवा मेंदू यावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. हा फुफ्फुसात देखील पसरू शकतो असे ही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

स्टेरॉईडचा अतिवापर हा या संसर्गामागील मुख्य कारण असल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले की, मधुमेह, कोविड पॉझिटिव्ह आणि स्टिरॉइड्स घेत असलेल्या रूग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक आहे.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.