बाबा राम रहीम आणि इतर 4 जणांना खून प्रकरणात जन्मठेप

0

- Advertisement -

चंदीगड: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह आणि इतर चार जणांना जवळपास दोन दशकांपूर्वी डे-याचा व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कृष्ण लाल, जसबीर सिंग, अवतार सिंग आणि अब्दिल अशी इतर चार जणांची नावे आहेत.

तसेच राम रहीम 31 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर अब्दिलला 1.5 लाख रुपये, कृष्णन आणि जसबीर यांना प्रत्येकी 1.25 लाख रुपये आणि अवतारला 75,000 रुपये दंड ठोठोवण्यात आला आहे.

दंडाच्या पन्नास टक्के रक्कम रणजीत सिंग यांच्या कुटुंबाला दिली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील सहाव्या आरोपीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला.

- Advertisement -

या महिन्याच्या सुरुवातीला हरियाणाच्या पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयात पुर्ण झालेल्या सुनावणीत पाचही आरोपी दोषी आढळले.

दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी 2017 मध्ये शिक्षा झाल्यापासून रोहतक जिल्ह्यातील सुनारिया कारागृहात बंद असलेला बाबा राम रहीम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषेश न्यायालयाच्या सुनावणीवेळी हजर झाला.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर संभाव्य हिंसाचाराच्या अपेक्षेने पोलिसांनी पंचकुला आणि सिरसा (जिथे डे-याचे मुख्यालय आहे) मध्ये सुरक्षा कडक केली.

डे-याचे व्यवस्थापक आणि बाबाचे अनुयायी रणजीत सिंह यांची 2002 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राम रहीमकडून महिलांचे लैंगिक शोषण कसे केले जाते हे सांगणाऱ्या एका निनावी पत्राच्या वादात त्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्याची हत्या करण्यात आली. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार राम रहीमने नंतर त्याला मारण्याचा कट रचला होता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.