कोरोनाचे एरोसोल 10 मीटर प्रवास करू शकतात हवा खेळती ठेवा; केंद्राच्या नव्या सुचना

0

- Advertisement -

कोरोना वा कोविड – 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घर वा आस्थापनांमध्ये पुरेशी हवा खेळती (ventilation) ठेवावी अशी सुचना केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने जारी केली आहे. कोरोना संक्रमणास मुख्य कारण एरोसोल (Air Droplets) असून विषाणूचे सूक्ष्म कण ह्या एरोसोलद्वारे (droplets) हवेमध्ये 10 मीटरपर्यंत पसरतात याचे पुरावे मिळत असल्याने विषाणू प्रादुर्भाव अटोक्यात ठेवण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

“Stop Transmission, Crush the Pandemic” नावाच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, कमी वेंटिलेशन असणारी घरे आणि कार्यालये विषाणुच्या संक्रमित हवेला कारणीभूत ठरत आहेत. चांगले वायुवीजन (ventilation) विषाणू संक्रमण होण्याचा धोका कमी करते. मार्गदर्शकतत्त्वानुसार वायुवीजनाबरोबरच, दुहेरी मास्क, सामाजिक अंतर, साफसफाई आणि यावरही भर देण्यात आला आहे.

तसेच एअर कंडीशन्स उपकरणे हे संक्रमित हवेला खोलीत कोंडून ठेवू शकतात त्यामुळे संक्रमण तीव्र होऊ शकते, त्यासाठी दरवाजे खिडक्या बंद करून एअर कंडीशन उपकरणे चालू ठेवणे हे घातक ठरु शकते, असा इशारा सुचनांमध्ये देण्यात आला आहे.

कोरोना-संक्रमित व्यक्तींचे शिंकल्याचे वा खोकल्याद्वारे बाहेर पडणारे थेंब हवेमध्ये दोन मीटर पर्यंत प्रवास करू शकतात, तर एरोसोल त्या थेंबांना 10 मीटर पर्यंत पसरवू शकतात त्यामुळे संसर्गाचा धोका तीव्र होतो. संसर्ग झालेली एखादी व्यक्ती परंतु ज्याला काही लक्षणे दिसत नाहीत त्यांच्याद्वारे देखील विषाणू संक्रमणास कारणीभूत थेंब इतरांना संक्रमित करू शकतात.

संक्रमित व्यक्तीद्वारे बाहेर पडणारे थेंब वेगवेगळ्या पृष्ठभागावर पडतात (जिथे ते दीर्घकाळ राहू शकतात), त्यामुळे दरवाजांचे हँडल, वीजेची बटणे, टेबल आणि खुर्च्या यांची ब्लीच किंवा फिनाईल सारख्या जंतुनाशकाने वारंवार साफसफाईची करावी असेही त्यात निर्देशित करण्यात आले आहे.

Pic – PIB

- Advertisement -

खुल्या खिडक्या आणि दारे, अगदी थोड्याशा खुल्या खिडक्या बाहेरील हवा खेळती करु शकतात आणि आतल्या हवेची गुणवत्ता सुधारू शकतात, असे त्यात नमूद केले.

सेंट्रल एअर-मॅनेजमेंट सिस्टम असलेल्या इमारतींमध्ये तसेच कार्यालये, सभागृह, शॉपिंग मॉल्स इ. मध्ये गॅबल फॅन सिस्टम आणि छतावरील व्हेंटिलेटर वापरावेत. तसेच अशा व्यवस्थांमधील फिटर्सची वारंवार साफसफाई आणि ते बदलण्याची शिफारस ह्या मार्गदर्शक तत्वांत करण्यात आली आहे.

Pic – PIB

 

पुरेशी हवा खेळती राहिल्यास म्हणजेच वायुवीजन संरक्षण म्हणून सर्वोत्तम पर्याय असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्यात संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी क्रॉस वेंटिलेशन म्हणजेच आतील हवा बाहेर जाणे आणि एक्झॉस्ट फॅन ही महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

इथे वाचा पुर्ण गाईडलाईन्स doc202151941

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.