महत्वाची बातमी: नोंदणीकृत कामगारांच्या निवृत्तीवेतन आणि विम्याच्या योजनांमध्ये बदल

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोविड -19 महामारीमुळे मृत्यूच्या वाढत्या घटनांनी कामगारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भवितव्याविषयी वाटणारी भीती व चिंता दूर करण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाने Employes State Insureance Corporation (ESIC) म्हणजे राज्य कर्मचारी विमा मंडळ आणि Employes Provident Fund Organisation (EPFO) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्या योजनांच्या माध्यमातून EPFO आणि ESIC यांच्याकडे  नोंदणीकृत असलेल्या कामगारांसाठी अतिरिक्त फायदे आज जाहीर केले आहेत.

या अंतर्गत EPFO चा सदस्य मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबाला सात लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळेल. याशिवाय अवलंबितांना ESIC योजनेंतर्गत पेन्शन मिळेल.

EPFO च्या EDLI Scheme (एम्पॅाईज् डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम) अंतर्गत सदस्याचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला किमान अडीच लाख रुपये आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपये विमा मिळेल. पूर्वी त्याची उच्च मर्यादा 6 लाख होती. नियमात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

 

कर्मचारी विमा योजनेत कोविडचा समावेश

- Advertisement -

तसेच ESIC योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या (Insured Person) व्यक्तींनी जर कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी आणि त्या रोगामुळे मृत्यू होण्याआधी ESIC च्या ऑनलाइन पोर्टलमध्ये नोंदणी केली असल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांना खालील पात्रता अटींच्या अधीन राहून त्या कर्मचाऱ्याच्या सरासरी दैनंदिन मजुरीच्या 90% इतके निवृत्तीवेतन त्याच्या पत्नीला आणि विधवा आईला आयुष्यभरासाठी आणि मुलांना त्यांच्या वयाच्या पंचविशी पर्यंत उपलब्ध असेल. मुलींना त्यांच्या लग्नापर्यंत हा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अ. कोविड रोगाने मृत्यूचे निदान होण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर विमा उतरवलेल्या व्यक्तींनी (Insured Person) ESIC ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेली असावी.

ब. कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी एका वर्षाच्या कालावधीत विमा उतरविलेला व्यक्ती कमीतकमी 78 दिवसांसाठी तो वेतनावर नियुक्त असावा.

सविस्तर माहीतीसाठी इथे क्लिक करा – PIB1722880

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.