धक्कादायक: प्रेयसी आणि पत्नीचीही केली ‘या’ कारणामुळे हत्या

0

- Advertisement -

सातारा:- वाई तालुक्यातील व्याजवाडी या गावातील नितीन गोळे या आरोपीने आपल्या पत्नी आणि प्रेयसीची हत्या केली. आपल्या पत्नी आणि प्रेयसीचे संबंध इतर पुरुषाशी आहेत असा त्याला संशय होता. याच संशयातून त्याने दोघींचे खून केले.

प्रेयसी अगोदर केला होता पत्नीचा खून
आरोपी नितीन गोळे हा आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह व्याजवाडी या गावांमध्ये राहत होता. त्याचे पत्नीशी सतत खटके उडत असत. नितीन याला आपल्या पत्नीचे इतर पुरुषाशी संबध आहेत असा संशय होता. याच संशयातून त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. त्याने आपल्या पत्नीचा खून हा मुलांच्या समोरच केला आणि मृतदेह शेतामध्ये नेऊन पुरला.

प्रेयसीची देखील केली हत्या
आरोपी नितीन गोळे याचे बाहेर एका स्त्रीशी प्रेमसंबंध होते. परंतु नितीन आपल्या प्रेयसीवर वारंवार संशय घेत असे. याच संशयातून त्याने प्रेयसीचा खून केला आणि तिचा मृतदेह शेतामध्ये नेऊन पुरला.

- Advertisement -

दोन खुनाची दिली कबुली
नितीन गोळे याला पोलिसांनी संशयातून ताब्यात घेतले होते. त्याने अगोदर प्रेयसीच्या खुनाची कबुली दिली होती. तपास करत असताना त्याच्या पत्नीच्या खुनाचा देखील छडा लावण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा. किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.