2021 अखेर जगाच्या 30 टक्के लोकांचेच होईल लसीकरण; WHO तज्ञाचा दावा

0

- Advertisement -

जगातील एकूण लोकसंख्येपैकी ३०% लोकसंख्याचेच लसीकरण 2021 च्या अखेरपर्यंत पुर्ण होऊ शकेल असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

देशातील सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरीही जूनअखेरपर्यंत देशात एकूण संक्रमितांची संख्या ३ कोटींवर जाऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. तसेच काही दिवसांत शक्य असलेल्या कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी भारतासारख्या देशांनी पुढील ६ ते १८ महिन्यांत वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

भारतात येत्या काळातील परिस्थित कशी असेल ते विषाणूच्या बदलत्या स्वरुपावर तसेच बदलेल्या विषाणूच्या स्वरुपावर लसीची परीणामक क्षमता पाहूनच ठरवावे लागेल असे त्या म्हणाल्या.

डॉ. स्वामीनाथन यांच्या मते, कोरोनामुळे होणा-या मृत्यूंच्या  प्रमाणात घट होईल परंतु लसीकरणानंतर हर्ड इम्यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी किती लोक सक्षम असतील याची सध्या काहीच माहिती देता येत नसल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी सागितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.