शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम बंद करा; शरद पवार

0

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे ओढवलेले संकट त्यावरून इंधनाचे वाढलेले दर अशा परिस्थितीत वाढविण्यात आलेले खतांचे दरांमध्ये वाढ करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. हा निर्णय अतिशय धक्कादायक असून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतक-यांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

रासायनिक खतांच्या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

- Advertisement -

याआधी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनीही केंद्राला पत्र लिहित रासायनिक खतांचे वाढलेले दर कमी करावे, अशी मागणी केली होती. रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी दादा भुसे यांनी त्यांच्या पत्रात केली होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.