एकाच डोसने होईल, कोरोना बाद

0

- Advertisement -

लंडन: भारतासहीत सगळ्या जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणूच्या संसर्गाला लसीच्या एका डोस मुळे ब्रेक लावला जाऊ शकतो असे इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य संस्थेने केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे.

लसीकरणामुळे लोकांचे जीव वाचत असून कोरोनाच्या संसर्गातही जवळपास 50 टक्क्यांनी घट होण्यास मदत होत असल्याचे ह्या संशोधनातून समोर आले आहे. ही एक खुपच सकारात्मक बातमी आहे, असे इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॅाक यांनी सांगितले आहे.

संशोधना अनुसार जर एखाद्या व्यक्तिने फायझर वा अॅस्ट्राझिंका या लसीचा एक डोस घेतला असेल आणि त्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर तो इतरांमध्ये होण्याची शक्यता ही फक्त 50 टक्केच असल्याचे दिसून आले आहे.

या अभ्यासाठी कोरोना ची लस घेतलेल्या 57 हजार लोकांची कोरोनाची लस न घेतलेल्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 10 लाख लोकांबरोबर  चाचणी कऱण्यात आली

 

 

 

- Advertisement -

इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेद्वारे हे संशोधन करण्यात आले आहे.

त्यात ज्या व्यक्ति लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर संक्रमित झाल्या होत्या, त्यांच्या घरातील इतर सदस्यांना संसर्ग होतो की नाही याचा अभ्यास यात करण्यात आला. त्यात घरातील इतर व्यक्तिंना झालेल्या संसर्गाचे प्रमाण हे 50 टक्क्यापर्यंतच असल्याचे दिसून आले आहे.

या संशोधनामुळे आपणांस लसींच्या कार्यक्षमतेबाबत अजूनही चांगली माहीती मिळाली असून आपण फक्त आणि फक्त लसीकरणानेच या साथ रोगापासून वाचू शकतो असेही हॅन्कॅाक यांनी म्हटले आहे.

या अभ्यासाठी कोरोना ची लस घेतलेल्या 57 हजार लोकांची कोरोनाची लस न घेतलेल्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 10 लाख लोकांबरोबर  चाचणी कऱण्यात आली

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.