बैठकीत खासदार आले चक्क ‘नग्न’…!

0

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक देशातील सरकारांचा ऑनलाईन कारभार सुरु आहे. कॅनडा देशातही असाचा व्हर्च्युअल कारभार सुरु असताना तेथील लिबरल पक्षाचे खासदार विल्यम अमोस  संसदेच्या सत्राची (हाउस ऑफ कॉमन्स) झूम कॉलवर सुरु असलेल्या बैठकीत चक्क नग्नावस्थेत दिसले.

कॅनडाच्या सुरु असलेल्या संसदीय सत्रादरम्यान त्याचा लॅपटॉप कॅमेरा चालू होता तेव्हा अमोस हे त्यांच्या घरातील कार्यालयात क्युबेक (कॅनडाची संसद)आणि कॅनडाच्या झेंड्यांच्या दरम्यान नग्नावस्थेत स्थितीत उभे असलेले दिसून आले.

“मी आज एक दुर्दैवी चूक केली आहे आणि अर्थातच मला यातून लाज वाटते” असे 46 वर्षीय या खासदार महोदयांनी ट्विट करीत आपल्या कार्यालयातील घटनेची बातमी सार्वजनिक केली.

- Advertisement -

त्यांनी संसदीय कामकाजातील मार्गदर्शक तत्वांचा भंग केला असून  ‘नियमांचे पालन केले पाहीजे, संसदीय बैठकसाठी कोणत्याही ड्रेस कोडची आवश्यकता नसते, परंतु पुरुष वक्त्यांनी “जॅकेट्स, शर्ट आणि टाईजसारखे समकालीन व्यवसाय पोशाख घातला पाहिजे” असे विरोधी पक्षाच्या व्हीप क्लेड डीबेलेफ्यूइल यांनी म्हटले आहे.

आमोसच्या लिबरल पक्षाचे नेतृत्व करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मात्र अद्याप या घटनेवर भाष्य केले नाही.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.