बंगालमधील विधानसभा निवडणुका २०२१: राहूल गांधींची प्रचार सभांना स्थगिती

माकपचीही खुल्या सभांना स्थगिती, ममतांचे पंतप्रधानांना पत्र

0

- Advertisement -

कोलकता: कोव्हीड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी बंगालमधील निवडणूक प्रचार सभांना स्थगिती दिली. निवडणुकीच्या फायद्यांपेक्षा जनतेच्या आरोग्यास प्राधान्य देणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत.  मार्कवादी कम्युनिस्ट पक्षानेही अशाच पद्धतीने प्रचार करण्याचे जाहीर केले आहे.

 

“कोविड परिस्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा स्थगित करत आहे.” वायनाडमधून खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट केले. बंगालमधील दोनच जाहीर सभांना संबोधित करणारे (गोलापोखोर आणि मातिगारा-नक्षलबाड़ी) राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये जोडले की, “सध्याच्या परिस्थितीत जाहीर सभा घेण्यामुळे होणा-या दुष्परिणामांबद्दल सखोल विचार करण्याचा सल्ला मी सर्व राजकीय नेत्यांना देईन.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसनसोल शहरातील सार्वजनिक सभेमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहील्याबद्दल लोकांचे आभार मानताचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल झाला होता. त्यानंतर राहुल यांनी स्वतःचा निर्णय जाहीर करीत इतरही राजकीय नेत्यांनी आपल्या सर्व सभा स्थगित करण्याच सल्ला दिला आहे.

- Advertisement -

मार्कवादी कम्युनिस्ट पक्षानेही याच पद्घतीने विधानसभा निवडणुकीचे त्या पक्षाचे दोन प्रमुख उमेदवार, मिनाक्षी मुखर्जी आणि श्रीजन भट्टाचार्य हे पारंपारिक माध्यमांद्वारे लोकांना संबोधित करणार असल्याचे जाहीर केले आहे.

माकपचे दिग्गज नेते आणि डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस सोमवारी सकाळी अशाच  पद्धतीने भाषण करतील. मिनाक्षी मुखर्जी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनी दूरदर्शनवरून सहकारी उमेदवार दिप्सिता धार आणि माकपचे ज्येष्ठ नेते अनिदी साहू यांच्यासमवेत निवडणूकीचा प्रचार करतील.

दरम्यान रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना पत्र लिहून कोविड रुग्णांची वाढत असलेली संख्या रोखण्यासाठी लस आणि जीवनरक्षक औषधांची मागणी केली.

“तुम्हाला आठवत असेल की 24 फेब्रुवारी 2021 रोजी मी तुम्हाला राज्याच्या निधीतून लसीचे डोस थेट विकत घेण्यास आणि संपूर्ण लोकसंख्येसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यास अनुमती देण्यासाठी लिहिले होते. तथापि, राज्यात मंजुरी मिळाली नाही, ” असे ममता यांनी पत्रात लिहिले आहे.

आपल्या पत्राद्वारे ममता यांनी नमूद केले आहे की, केंद्राकडून पुरवठा अनियमितपणे केला जातो. “बंगालमध्ये 2  कोटीहून अधिक लोकांना लसी द्यावी लागणार असून त्यासाठी आम्हाला साडेचार कोटी डोसची गरज आहे,” असे ममता यांनी लिहिले आहे.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.