केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने, परंतु महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचं नाही, ‘या’ भाजप नेत्याने केली टीका

0

- Advertisement -

मुंबई: मराठा आरक्षणावर मोठा निर्णय आज केंद्राने घेतला आहे. केंद्राने 102 व्या घटनादुरूस्तीमध्ये बदल करून आरक्षणाचा अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला . हा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “फक्त राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही कारण आरक्षणाची 50 टक्के मर्यादा मराठा आरक्षणाच्या आडवी येत आहे. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काढणे गरजेचे आहे.”

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे.

राज्य सरकारला आरक्षण द्यायचंच नाही…

ज्यावेळी राज्यांना अधिकार नव्हते त्यावेळी ते मागत होते. आता केंद्र सरकारने राज्यांना अधिकार दिले आहेत तर महाविकास आघाडी सरकार त्यावरही टीका करत आहे. मुळात महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नसल्याचा खळबळजनक आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

- Advertisement -

केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने…

केंद्रसरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे, त्यामुळेच केंद्राने 102 व्या घटनादुरूस्तीत बदल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्य सरकारची हतबलता असल्यानं ते आरक्षण देणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. आरक्षण देण्याची भूमिका आणि धाडस अशोक चव्हाण यांच्यात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. केंद्र सरकारनं आता निर्णय दिला असल्यामुळे राज्य सरकार हात वर करत आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.