उत्तरप्रदेश निवडणूक: मायावती चक्क निवडणूकीच्या रिंगणाबाहेर ?

0

- Advertisement -

लखनौ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याने सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे बसप खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी सांगितले.

मायावती यांनी यापूर्वी कधीही राज्यात विधानसभा निवडणूक लढवली नाही. मिश्रा म्हणाले, “समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवार नसतील तर ते 400 जागा कशा जिंकतील?”

बसपा खासदार म्हणाले की समाजवादी पक्ष किंवा भाजप दोघेही सत्तेत येणार नाहीत आणि उत्तर प्रदेशमध्ये बसपा सरकार स्थापन करणार आहे. उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघांसाठी 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 आणि 7 मार्चला सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

- Advertisement -

पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला आणि मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ६ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) 403 पैकी 312 जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून सुरवातीला 298 जागांवर आणि नंतरच्या 105 जागांवर युती केली होती. त्यात सपाला केवळ 47 जागा जिंकता आल्या तर काँग्रेसने 7 जागा जिंकल्या. बहुजन समाजवादी पक्षाने (बीएसपी) 19 जागा जिंकल्या होत्या.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.