ममता बॅनर्जी उभ्या असलेली पोटनिवडणूक नाही करता येणार रद्द, कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल

0

- Advertisement -

कोलकाता:  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढवीत असलेल्या भवानीपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक रद्द केली जाणार नाही. गुरुवारी (30 सप्टेंबर) निवडणूक आयोगाने ठरविलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्यात येईल, असा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने आज दिला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मार्च-एप्रिल मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. राज्यघटनेनुसार एखाद्या व्यक्तीला मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून यावे लागते.

एका जनहित याचिकेने कोलकातामधील भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या “संवैधानिक निकष” च्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याची सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द करण्यास नकार दिला आहे.

ममता बॅनर्जींसाठी तृणमूलचे आमदार सोवंदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची विधानसभेसाठी निवड सुलभ होण्यासाठी भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या 41 वर्षीय कोलकाता उच्च न्यायालयाच्या वकील प्रियंका तिब्रेवाल उभ्या राहिल्या आहेत.

- Advertisement -

राज्य निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या बॅनर्जी यांना त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी आमदार म्हणून भबानीपूर पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. या निवडणूकीचा निकाल 3 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होईल.

दरम्यान, भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांना तृणमूल काँग्रेसच्या कथित समर्थकांनी सोमवारी धक्काबुक्की केल्यामळे घोष यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला पिस्तूल बाहेर काढणे भाग पडले होते. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.