ऑक्सिजनच्या अभावामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल प्रियंका गांधींनी मोदी सरकारला घेरले

0

- Advertisement -

नवी दिल्ली: मागच्या काही आठवड्यात देशभरात कोरोनाने भयंकर उन्माद मांडला होता. त्यात ऑक्सिजन आणि बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड झाली होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला होता.

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणा जिम्मेदार असल्याचे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, जर केंद्राने पहिल्या आणि दुसर्‍या लाट दरम्यानच्या काळात व्यवस्थित नियोजन केले असते तर हे संकट टाळता आले असते. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, सन 2020 मध्ये केंद्राने ऑक्सिजन निर्यातीत 700 टक्क्यांनी वाढ का केली? मोदींनी विशेषाधिकारप्राप्त गटाच्या ऑक्सिजन संकटाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष का केले ?

क्रायोजेनिक टँकरची संख्या का वाढवली नाही?

- Advertisement -

“साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी ऑक्सिजनचा वापर प्रामुख्याने औद्योगिक कारणांसाठी केला जात असे, म्हणून ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी भारतात खास डिझाइन केलेले क्रायोजेनिक टँकर वापरले गेले. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट यांच्या दरम्यान मोदी सरकारने या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रयत्न का केला नाही. ‘

त्यांनी दावा केला की, ‘भारत ऑक्सिजन उत्पादित करणारा सर्वात मोठा देश आहे, परंतु केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनचे संकट उद्भवले आणि लोक मरण पावले. केंद्र सरकारने 150 ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी बोली लावली होती, परंतु अद्यापही बहुतेक प्लांट कार्यान्वित झालेली नाहीत.’

प्रियंका गांधीची फेसबुक पोस्ट

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.