कॅांग्रेस अध्यक्षांची निवड लांबणीवर

0

- Advertisement -

पाच राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. परंतु कोरोना संकटाचे कारण देत पक्षाने काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. करोना संकटाचं कारण देत पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीने पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख ७ जून ठेवण्याची सूचना केली होती. तसेच निवड समितीने २३ जूनला मतदानाचा प्रस्ताव ठेवला होता.  परंतु काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले असल्याचे वृत्त एएऩआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कधी घ्यायची या निर्णय काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समिती घेईल,

२२ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षाची निवड जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- Advertisement -

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत.

दरम्यान, बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्ष सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली असून
आपल्याला पाच राज्यातील या निवडणूक निकालांची नोंद घेणं गरजेचं आहे. या राज्यातील पराभवाला कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक मुद्यावर विचार-विनिमय करण्यासाठी एक गट नेमून त्याने लवकरात लवकर अहवाल घ्यावा असे म्हटले आहे.

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरलंय, असे स्पष्ट करतानाच कोरोनाच्या संकटावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी सोनिया गांधी पुन्हा एकदा केली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.