बाबा रामदेववर भडकले आरोग्यमंत्री, ‘ते’ विधान मागे घेण्यास सांगितले

0

- Advertisement -

कोरोना काळात योगगुरु रामदेव बाबा सतत चर्चेत आहेत. कधी कोरोनाचे औषध बनवल्याचा दावा करतात, तर कधी कोविड-19 रुग्णांची खिल्ली उडवतात. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी अतिशय आक्षेपार्ह आणि गंभीर वक्तव्य केले होते.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी एक पत्र लिहून योग-गुरु रामदेव यांना कोरोना योद्धाविरूद्ध केलेले ‘आक्षेपार्ह वक्तव्य’ मागे तत्काळ घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्विट्टर लिहिले की, योगगुरु रामदेव यांच्या विधानामुळे कोरोना योद्ध्यांचा अपमान आणि देशाच्या भावना दुखावल्या आहेत. मी त्यांना एक पत्र लिहून त्यांचे आक्षेपार्ह विधान मागे घेण्यास सांगितले आहे.

अ‍ॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवरील तुमच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशवासीय मनापासून दु: खी झाले आहेत. कोरोनाविरूद्ध रात्रंदिवस लढणारे डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी संपूर्ण देशवासीयांसाठी देवासमान आहेत. आपल्या वक्तव्यामुळे आपण केवळ कोरोना योद्ध्यांचा अनादरच केला नाही तर देशवासीयांच्या भावनांनाही दुखावले आहे. आपण शनिवारी जारी केलेले स्पष्टीकरण लोकांच्या दुखावलेल्या भावनांना बरे करण्यासाठी पुरेसे नाही.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

बाबा रामदेव यांचा 2 मिनिटे 19 सेकंदाचा एक विडियो सोशल मीडियावर वायरल होत आहे. या विडियोमध्ये बाबा रामदेव त्यांच्या शिष्यांसमोर मोबाइलमधील एक संदेश वाचताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्यांनी अलोपॅथिक औषधांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठविली कायदेशीर नोटीस

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) तीव्र आक्षेप घेतला आहे. आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे रामदेव यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रामदेव यांच्या विधानावर आयएमएने कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

रामदेव यांच्या वक्तव्यानंतर पतंजली योगपीठ सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की बाबा रामदेव फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश वाचत होते. आधुनिक विज्ञान आणि चांगल्या डॉक्टरांविरूद्ध त्यांचा कोणताही वाईट हेतु नसल्याचेही ते म्हणाले.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.