विजयी मिरवणूकांवर आयोगाची बंदी….

0

- Advertisement -

नवी दिल्ली: काल मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर भारतीय निवडणूक आयोग जागा झाला असून येत्या मंगळवारी पाच राज्यात होणा-या निवडणूकांच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणूका काढता येणार नाहीत असे आज स्पष्ट केले आहे.

मतमोजणीसाठी व त्याच्या दुस-या दिवशीसाठीच्या सविस्तर नियमांचा आदेश हा लवकरच जाहीर केला जाईल.

 

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना निवडणूका प्रचार सभांना परवानगी दिलीच कशी आणि त्यासाठी आयोगच जबाबदार असल्याचे नमूद करीत काल मद्रास कोर्टाने निवडणून आयोगाला सुनावले होते. तसेच येत्या मतमोजणीच्या दिवशी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी काय नियमावली केली असा प्रश्न उपस्थित करीत मद्रास उच्च न्यायालयाने 30 एप्रिल पर्यंत उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यास सांगितले होते.

त्यावर आज भारतीय निवडणूक आयोगाची प्रतिक्रीया आली आहे.

- Advertisement -

आयोगाची प्रेस नोट 

गेल्या काही दिवसांपासून देशात दरोरोज दोन हजारहून अधिक नागरिकांचे मृ्त्यु होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आयोगाचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रीया नोंदविल्या जात आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.