दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेक-यांची शिक्षा माफ करावी: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

0

- Advertisement -

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या सात आरोपींची शिक्षा माफ करून त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एका पत्राद्वारे केली आहे.

 

“तामिळनाडू मधील बहुतांश राजकीय पक्ष या सर्व सात आरोपींच्या तत्काळ सुटकेची मागणी करीत आहेत. एवढेच नाही तर तामिळनाडूच्या जनतेची देखील हीच इच्छा आहे. या आरोपींनी मागील तीन दशकात बऱ्याच यातना सहन केल्या आहेत. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा आपण स्वीकार करावा आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा आणि त्यांच्या तत्काळ सुटकेसाठी आदेश द्यावा.” असे स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.