अखेर इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन मधील संघर्ष थांबला; दोन्ही बाजूंची शस्त्रसंधीस मान्यता.

0

- Advertisement -

इस्रायल आणि पॅलेस्टाइन वर सत्ता असलेल्या हमास मधे मागील ११ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर थांबला आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या दरम्यान इजिप्तने मधस्थी करीत ही शस्रसंधी घडवून आणली आहे,

 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळाने इजिप्तने दिलेल्या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता दिल्यानंतर ही शस्त्रसंधी शुक्रवार (21 मे) पासून सुरु झाली आहे. दरम्यान इजिप्त ने दोन्ही बांजूंकडून या शस्त्रसंधीचे पालन होते की नाही यांवर देखरेख करण्यासाठी दोन शिष्टमंडळे देखील पाठविली आहेत.

इस्त्राइल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही राष्ट्रांवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून संघर्ष थांबविण्यासाठी प्रचंड दबाव होता. अमेरिकेने इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी संघर्ष थांबविण्याची विनंती केली होती तर कतार., इजिप्त आणि संयुक्त राष्ट्र संघाने ह्या संघर्षात मध्यस्थीची तयारी दाखविली होती.

 

गेल्या 10 मे रोजी पवित्र रमजान महिना सुरु असताना अल अक्सा मशिदीत इस्त्रायलच्या पोलिसांनी बळजबरी प्रवेश केला होता. त्याच्यानंतर दोन्ही बाजूंकडून ऐकमेकांवर रॅाकेट द्वारे हल्ले करीत संघर्ष सुरु झाला होता.

दोन्ही बाजूंकडे जिवितहानी

अकरा दिवस चाललेल्या या संघर्षात इस्त्राइलद्वारे केल्या गेलेल्या रॅाकेट हल्ल्यांत 65 मुले आणि 38 स्त्रीयांसह 231 पॅलेस्टाइन नागरिक ठार झाले तर 1 हजार 900 अधिक जखमी झाले असल्याची माहीती गाझातील आरोग्य विभागाने दिली आहे. तर हमासने इस्त्रायल वर डागलेल्या क्षेपणास्रांच्या हल्ल्यात एका लहान मुलासह एक 16 वर्षाची मुलगी आणि एका सैनिकासह 12 इस्त्रायली नागरिक ठार झाले असून शेकडो जखमी झाले असल्याची माहीती इस्त्रायल कडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हमासने ह्या संघर्षाला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या ताकदवर असलेल्या पारंपारीक शत्रुचा यशस्वी विरोध अशा शब्दांत वर्णन केले आहे.

ह्या संघर्षाची संधीची घोषणा होताच पॅलेस्टाइनमधील अनेक लोकांनी रस्त्यावर येत एकच जल्लोष केला. तसेच अनेक मशिदीतून लाऊडस्पीकर द्वारे हा पॅलेस्टाइनचा विजय असल्याचे  सतत उदघोष सुरु होते.

तर इस्त्रायलमध्ये विविध रेडीओ स्टेशन्सवर जिथे संघर्षाचे सतत समालोचन सुरु होते ते बंद होऊन गाणी बजावणी सुरु झाले.

शस्त्रसंधीचे अमेरिकेने केले स्वागत

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या शस्त्रसंधीचे स्वागत केले असून त्यांनी म्हटले की, पॅलेस्टाइन व इस्रायलमधील नागरिकांना सुरक्षितपणे जगण्याचा, स्वतंत्रता, समृद्धी आणि लोकशाहीचे अधिकार मिळवण्याचा समान अधिकार आहे. यासाठी अमेरिका संयुक्त राष्ट्र संघटनेसह गाझातील नागरिकांना मदत पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.