राजकीय घमासान: केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर खुनाचा गुन्हा, 4 शेतक-यांसह 8 लोकांचा मृत्यु, प्रियंका गांधीनाही पोलिसांद्वारे अटक

0

- Advertisement -

लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर कार चालवल्याच्या आरोपावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये इतर अनेक लोकांचीही नावे आहेत. या घटनेत ठार झालेल्या आठ लोकांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलांने गाडी घातली होती. त्यात चार शेतक-यांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर शेतक-यांनी प्रत्युत्तरात केलेल्या मारहाणीत 4 समर्थकांचा मृत्यु झाला तर परिसरातील अनेक गाड्यांना आगी लावण्यात आल्या होत्या.

दरम्यान आज (4 आक्टोबर) पहाटे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या लखिमपूर खेरी या गावात झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जात होत्या. प्रियांका गांधी वड्रा यांना सीतापूर पोलीस लाईनमध्ये नेण्यात येत असल्याचे सांगत काँग्रेसने एक व्हिडिओ ट्विट केला आणि लोकांना तेथे जमण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

“तुम्ही मारलेल्या लोकांपेक्षा मी महत्वाची नाही. या सरकारचा तुम्ही बचाव करत आहात. तुम्ही मला कायदेशीर वॉरंट, कायदेशीर आधार द्या नाहीतर मी येथून हलणार नाही आणि तुम्ही माझ्या अंगाला हात लावायचा नाही,” असे संतप्तपणे त्या पोलिसांना सुनावत असल्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांत प्रचलित झाला आहे.

दरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना लखीमपूर खेरी जिल्ह्याला भेट देण्यासाठी घर सोडण्याची परवानगी न दिल्याने ते राजधानी लखनौ मधील त्यांच्या घराबाहेर धरणे आंदोलनावर बसले आहेत.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.