महापालिका निवडणूका 2022 : निवडणूक आयोगाकडून तयारी सुरु, एक सदस्यीय प्रभाग रचना होईल लागू

0

- Advertisement -

मुंबई: राज्यातील 2022 मध्ये मुदत संपणा-या महापालिकांच्या निवडणूकींची तयारी निवडणूक आयोगाने सुरु केली असून त्यासदर्भातील महापालिकांचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी आयोगाने राज्यातील मुदत संपणा-या महापालिकांच्या आयुक्तांना जारी केले आहे. यात विषेश म्हणजे महापालिका वार्ड रचना ही किती सदस्यीय असावी असा प्रश्न निकाली निघणार असून आयोगाने येत्या निवडणूकांत एक सदस्यीय वार्ड रचना असणार असल्याचे जाहीर केले आहे.

येत्या 2022 साली राज्यातील मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांची मुदत संपत आहे. तसे ह्या महापालिकांच्या आय़ुक्तांना राज्य निवडणूक आयोगाने तयारी संदर्भात पत्र जारी केले आहे.

मागील भाजपा सरकारने राज्यातील महापालिका निवडणूकांत चार सदस्यीय प्रभागरचना लागू केली होती परंतु महाविकास आघाडीने 31 डिसेंबर 2019 रोजी महापालिका निवडणूकांतील ती प्रभाग रचना रद्द करीत एक सदस्यी प्रभाग रचना कायदा संमत केला होता.

- Advertisement -

प्रभार रचना आणि कच्चा आराखडा तयार करण्यासाठी 2011 च्या जणगणेचा विचार करून मतदारसंख्या निश्चित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रभागाच्या प्रारुप रचनेचे काम 27 ऑगस्टपासून सुरु करून ते लवकरात लवकर पुर्ण कण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

 

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.