ममतांची हॅटट्रीक तर तामिळनाडूत सत्ताबदल शक्य ! एक्झिट पोलचे अंदाज

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशातील आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांत झालेल्या निवडणूकीसाठीचे मतदान आज अखेर पश्चिम बंगाल मधील 8 व्या अंतिम टप्प्याच्या मतदान फेरीसह पुर्ण झाले आहे.

त्यामुळ विविध सर्वेक्षण संस्था तसेच माध्यम संस्थांनी आपले निवडणूकीच्या मतदान मोजणी पूर्वीचे (एक्झिट पोल) अंदाज घोषित करण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम बंगाल राज्यात एकूण 294 जागा असून बहूमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत. एबीपी आणि सी व्होटर यांच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॅांग्रेस आघाडीच्या निवडून येणा-या उमेदवारांच्या संख्येत घट दिसत असली तरी बॅनर्जींना 152 ते 164 जागा मिळून स्पष्ट बहूमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाची कडवी झुंज मोडीत काढीत तृणमूल कॅांग्रेस पक्ष सत्तेची हॅटट्रिक करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला 109 ते 121 दरम्यान जागा मिळून ते राज्यात दुस-या क्रमांकावर राहतील तर डाव्यांच्या पक्ष आघाडीला 14 ते 25 दरम्यान जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तामिळनाडूमध्ये सत्ता बदल होऊन राज्यातील एकूण 234 जागांपैकी एम. के. स्टॅलिन ह्यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम ह्या पक्षाला 171 जागा मिळत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाला स्पष्ट बहूमत मिळून सत्तेत येणार असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या विरोधातील व सद्यकालीन सत्ताधारी ऑल इंडिया आण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या आघाडीस 58 जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

केरळ राज्यात डावी लोकशाही आघाडी (LDF) यांना रिपब्लिक टिव्ही आणि सीएनएक्स मिडीया यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण 140 जागांपैकी 72-80 जागा मिळून त्यांची सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. तर कॅाग्रेस प्रणित आघाडीला (UDF) 58 ते 64 जागा आणि भारतीय जनता पक्ष आघाडीस 1- 5 जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसून आले आहे.

तर आसाम मध्ये 126 जागांपैकी बहूमतासाठीच्या 64 जागा आरामात मिळवत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आघाडी 73 ते 75 जागांवर मिळवत आघाडीवर राहतील असा अंदाज इंडीया टुडे आणि अॅक्सिस या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे.

पुदुच्चेरी राज्यातील विधानसभेत एकूण 30 जागा असून बहूमतासाठी 16 जागांची आवश्यकता आहे. तिथे भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीस 15 -20 जागा मिळत स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहेत, तर कॅांग्रेस आणि डीएमके यांच्या आघाडीला 11 -13 जागा मिळतील असा अंदाज रिपब्लिक – सिनएक्स या संस्थांनी मिळून केलेल्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.