मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

0

- Advertisement -

मराठा आरक्षणाबाबत काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन दिले आहे.

मराठा आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आले असून लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

या आधीच्या सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा जर ‘फुलप्रुफ’ असता तर तो सर्वोच्च न्यायालयात टीकला असता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत लगावला. दरम्यान, मराठा समाज हा अत्यंत समजदार आणि सोशिक आहे. त्यामुळे या समाजाने सरकारच्या भावना समजून घेतल्या आहेत. या समाजाचे आरक्षण टीकावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात यश आले नाही. परंतू, या समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भावना राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना पोहोचवल्या आहेत. याशिवाय आरक्षणासंदर्भात काही सहकार्य लागल्यास कर्तव्याच्या भावनेतून तेही करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

- Advertisement -

राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

“महाराष्ट्राच्या विधीमंडळात एक मताने, एक मुखाने, सर्व पक्षांनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला जो काही विरोध झाला, जे काही असेल पण तो निर्णय़ विचारपूर्वकच घेतलेला आहे. त्या विचाराचा केवळ आमचा निर्णय़ म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय़ आहे. त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्याय हक्क आरक्षणाचा जो आहे तो मिळाला पाहिजे, अशीच आमची भावना आहे.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.